Abhipray

⭕"वास्तु" एक अद्भुतशास्र⭕
""""""""""""""""""""""""""""""""""""""""
भाग- २

नमस्कार..!

दोन मित्रांनी वास्तुशास्रवर आपला विश्वास नसून आपण असल्या गोष्टी मानत नसल्याचेही कळविले.

मुळात मी सुध्दा या शास्राला मानत नव्हतो. हे शास्र म्हणजे सर्व सामान्य माणसाकडून पध्दतशीर पैसे उकळण्याचा प्रकार असावा असे मला फार पूर्वी वाटायचे.
परंतु....
ज्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही त्याबद्दल काहीही जाणून न घेता ती गोष्ट धुडकावून लावणेचा उध्दटपणा माझ्या स्वभावात नसल्याने मी दुर्लक्ष केले.
"पिरॅमिड" वर ३० वर्षापेक्षा अधिक कालावधी संशोधन करणारे आणि आपल्या "पायरावास्तु"च्या माध्यमातून देशविदेशात गाजत असलेले बडोद्याचे डाॅ.जितेन भट्ट यांच्या पायरावास्तुचा अभ्यास मी केला.
बडोद्याला जावून दोनवेळा वर्कशाॅप केलेत.

जितेन भट सरांच्या मते कुठलीही घटना घटित होण्यासाठी शिव आणि शक्ती या दोहोंची आवश्यकता असते.त्यांच्या भाषेत ते फादर आणि मदर एनर्जी म्हणतात.
या दोन्ही उर्जांच्या योग्य मिलाफातून ही घटना घडत असते.आणि मनोवांछित घटना घडवून आणण्यासाठी अद्भूत अशा चमत्कारिक "आकारा"चा म्हणजे विशिष्ट रेशोच्या "पिरॅमिडचा" एक साधन म्हणून आपण उपयोग करू शकतो.
असे त्यांचे ठाम मत आहे.

प्रत्येक माणसात नैसर्गिकपणे शिव आणि शक्ति असते.
डावी बाजू मदर एनर्जी आणि उजवी बाजू फादर एनर्जीची असते.एखाद्या माणसाला हत्याराने मार लागल्यावर त्याला ज्या वेदना होतात त्या वेदना जर अश्रूवाटे बाहेर आल्या तर उजव्या डोळ्यांतून पहिला अश्रू बाहेर येतो आणि हीच वेदना जर भावनिक असेल तर डाव्या डोळ्यातून अश्रू येतो.याचा अर्थ शारीरिक वेदना या पुरूष तर भावनिक वेदना ही स्री तत्वाची असते हे नैसर्गिक सत्य आहे.
म्हणजे प्रकृति आपले कार्य तिच्या नियमानुसार करत असते.

पिरॅमिड डाव्या हातात घेवून त्यावर उजवा हात ठेवून त्या चमत्कारीक आकारात इच्छा फुंकून अर्थात कमांड देवून आपण कोणत्याही वास्तुत पाहिजे तसे परिणाम घेवू शकतो.

कोणत्याही वास्तूचा सेंन्टर म्हणजे आत्मा अॅक्टिव्ह करणे महत्वाचे म्हणून तेथे पाॅवरफुल पिरॅमिड स्थापित केले तर अपेक्षित परिणाम मिळतात.
तसेच वास्तुतील ऊर्जा ही पिरॅमिडच्या माध्यमातून स्थलांतरीत करता येते असा त्यांचा मोठा दावा आहे.

जितेन भट सरांच्या "पायरावास्तु"चा अभ्यास करत असतांना या विषयावर जे जे ऎकायला,पहायला,वाचायला मिळेल ते ते मी मिळेल तसे अभ्यासत गेलो.

या विषयांवर लिहीलेली अनेक वास्तुतज्ञांची पुस्तकं वाचलीत.
वास्तुशास्रचा अभ्यास करत असतांना डाऊझिंग शिकले पाहीजे असे वाटल्याने मुंबईचे डाॅ.रवी वैद्य सर यांच्याकडून ते शिकण्याचा प्रयत्न केला.

टि.व्ही.वर नेहमीच दिसणारे रूबाबदार व्यक्तिमत्व डाॅक्टर पुनीत चावला यांचे लाईव्ह वास्तु चे असंख्य व्हिडिओज अभ्यासलेत.क्रिस्टलच्या माध्यमातून आणि नंतर त्यांनी तयार केलेली विशिष्ट सिक्रेड जिओमेट्रिक वास्तुयंत्रांना समजून घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान...
डाॅक्टर "नरेंद्र हरी सहस्रबुध्दे" या नांवाचा प्रचंड दबदबा या क्षेत्रात वाढला असल्याचे माहीत झाल्याने मी त्यांच्या पुस्तकांचे वाचन केले.आणि मी ख~या अर्थाने भारावून गेलो.सहस्रबुध्दे सरांची पुस्तकं वाचत असतांना खात्री झाली की प्रकांड पंडित असलेल्या सरांकडून वास्तुशास्र शिकलेच पाहीजे.
सहस्रबुध्दे सरांचा वर्कशाॅप केला.अनेक वेळा त्यांची पुस्तकं वाचत असतांना प्रत्येक वेळी ते नवीन वाटते. वास्तुशास्रच्या या आधुनिक ऋषीच्या पायाशी बसून भारतीय दर्शन शास्राच्या पंचशास्रांचा अभ्यास करायला हवा अशी कामना मनात येत राहते.
सरांचा जाॅली स्वभाव नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो.त्यांचे एक एक वाक्य सुभाषितासारखे वाटते."तारतम्य"ठेवून डोळस वृत्तीने वास्तूची उपाययोजना केली पाहीजे.
कर्मकांडाच्या अवडंबरमधे न फसता निसर्गातील पंचतत्वांच्या विविध रुपातून ऊर्जा आणि तत्वांचे संतुलन राखता आले पाहीजे हा सरांचा आग्रह असतो.
त्यासाठी.. धातू,रत्न,पिरॅमिड,रंग,विविध वनस्पति,झाडे यांचा तार्किकतेने उपयोग करून घेता आला पाहीजे अशी सहस्रबुध्दे सरांची theory
माझ्यामते याक्षेत्रातील
"बाप माणूस" जर कोणी असेल तर डाॅक्टर नरेन्द्र हरी सहस्रबुध्दे सर.!!
सरांनी लिहिलेल्या १५ पुस्तकांचा अभ्यास जर व्यवस्थित केला तर "वास्तु"समजून घेणे कितीतरी सोपे होते.

वास्तुशास्र या प्रांतातील माझे गुरु सहस्रबुध्दे सरांना मी वंदन करतो
NIRAMAYVAASTU
Niranjan vhotkar pune
Sent from my iPhone

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta