दिपावली💐🌺💐

28/10/16, 8:50:31 PM: Narendra: आममाणसांचे अंत:करण ह्रदयात असते व तेथे भावभावनांचे हलकल्लोळ चालतात पण संत व योगियांचे अंत:करण आज्ञाचक्रात असते व तेथे भावभावनांचे कोष असतात.जेव्हा माऊली म्हणतात की
ते ज्ञान ह्रदयी प्रतिष्ठे
आणि शांतिचा अंकुर फुटे
मग विस्तार बहु प्रगटे
आत्मबोधाचा ।।
तेव्हा हा संदर्भ सहज समाधी अवस्थेचा असतो म्हणून सर्व संतांची दृष्टी नासाग्र असते की जेथे खरे ह्रदयाचे स्थान आहे💐🙏💐
28/10/16, 8:50:31 PM: Narendra: आज्ञाचक्र किंवा भ्रूमध्य ही जागा ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या वर आहे त्यामुळे सर्व भोग वासना इंद्रियजन्य सुखांच्या वर आहे.या चक्राला म्हणूनच महाद्वार म्हणतात.येथून पुढे खरा अध्यात्माचा प्रवास सुरू होतो.या जागी चंद्र व सूर्य नाड्यांचा संगम होतो म्हणजेच या चक्रावर ध्यान केल्यास मन-चित्त-बुध्दीचे ऐक्य सहज होते.येथूनच प्राणांचा प्रवास उर्ध्वमुख होतो.येथे ध्यान लावल्यास चंद्र सूर्य नाडीचे सहज नियमन होते.या चक्रावर ध्यान लागणे म्हणजे दीप लागणे व हीच खरी जीवाची दिपावली.या महाद्वारात दीप लागणे म्हणजेच जिवाला शिवाचे दर्शन होणे;हेच जीवाचे आद्य कर्तव्य आहे.प्रतिकात्मक दारात दीप लावणे याचा हा आंतरिक गूढार्थ 💐🌞
28/10/16, 8:50:31 PM: Narendra: मन सहजच आज्ञाचक्रावर स्थिर होण्यासाठी व ही प्रक्रिया नकळत एक स्वभाव होण्यासाठी हिन्दू संस्क्रृतीत गंध-तिलक-कुंकुम लावण्याची प्रथा आहे.जेथे मन तेथे प्राण -जेथे प्राण तेथे ध्यान अशी योगशास्त्राची त्रिसुत्री आहे व त्याचेच प्रतिबिंब प्रथा व संस्कृतींत दिसुन येते.
भाल गोल ऐसे पूर्वेचे आंगण।
तिलक कुंकुम सूर्यासरिसा।।
असे गुरूपाठात श्री माताजींचे वर्णन आहे💐🌺💐


Sent from my iPhone

Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta