गाणे माझे गोड न गळा न मधुर काना त्याला सूर काळाचे वेडे बेसुर नी ताना भग्न मूर्तींची पूजा नी जीव असे भुकेला भूतक होऊनी भूत बैसे दीन बळी घेण्या।।१। सभोवताला व्यापून पुतळे कबरीतून जागा युवा झोपूनी त्या कबरींवर स्वत: भूत झाला कुणी धर्म नी ध्वजा वाहती त्यावर ओले डाग कुणी बुध्द नी कुणी शिवाचे डोक्यावर ओझ||2|| विसरुनी स्वला परावलंबी हे जन ऐसे गाढव स्वत:हून काही न थोर जगी हेच खरे सत्य तया विसरता माया वैरीण विणे जाळे सुंदर अडकुनी कोळी जात बळी नी जात होय शूळ||3||


Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta