ज्याचे त्याचे सोडून स्वत्व उभे नागवे येथे पुन्हा पाहती वाकवाकूनी नग्न कोण झाले जगतो मी घालून अवघी पुतळ्यांची वसने नी तिरडीच्या बांबूची केली मीच येथ घरे।१। पुढीलांसाठी चिता रचूनी भूतकांची सरणे वरी घालूनी जुन्याच शाली सरणा सजविले पायवाट ही होत हमरस्ता स्मशानात झेंडे पळपळ विणले ज्वाळांनि हेवर्तमान पेटले।२ कशास कालच्या खुळ्या खुणा नि मेलेली हे जुने दाखले भूत बनूनी येथ नर्क निर्मिती जुने जाऊ द्या मरणा लागूनी सुर्यासम उगवी नवेच माझे मीपण रचले चंद्र धरोनी शिरी।३


Popular posts from this blog

Ratnadhyay

Shikhi Devta